'बालिका वधू'मध्ये (Balika Vadhu) छोट्या आनंदीची भूमिका साकारून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अविका गौर आता खूप मोठी झालीये.
अविकाचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
कधी जांभळ्या तर कधी गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये अभिनेत्री अविका गौर कमालीची दिसत आहे.
अभिनेत्री अविका ससुराल सिमर का, लाडो-वीरपूर की मर्दानी, झलक दिखला जा-5 आणि खतरों के खिलाडी-9 सोबत बालिका वधूमध्ये दिसलीये.
अविकानं टीव्ही मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवलाय. यावर्षी तिचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ती नागा चैतन्यच्या 'थँक यू'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलीये.
यासोबतच अभिनेत्री अविका गौर लवकरच बॉलिवूडमध्येही दिसणार आहे. ती लवकरच '1920: हॉरर्स ऑफ द हार्ट'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
यासोबतच ही अभिनेत्री मिलिंद चांदवानीसोबत गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.