Health Tips : अ‍ॅसिडिटीपासून आराम हवा असेल तर 'ही' फळे नक्की खा..

| Sakal

अपुरी झोप आणि अवेळी जेवण यामुळे अॅसिडिटीचे प्रमाण वाढते. यामुळे जीवनशैलीवर परिणाम होतात आणि याचा त्रास उद्भवू शकतो.

| Sakal

अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक औषधे घेत असतात. मात्र यामुळे शरीराला दुष्परिणाम दिसून येतात.

| Sakal

मात्र अशी काही फळे आहेत, जी अॅसिडिटीपासून दूर ठेवतात किंवा तुम्हाला ही फळे खाल्ल्याने आराम मिळतो.

| Sakal

कलिंगडमध्ये फायबर असते. यामुळे पचनास मदत होते. यामुळे अन्नाचे पचन नीट होते आणि अॅसिडीटीपासून दूर राहतो.

| Sakal

स्ट्रॉबेरीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामध्ये लोह, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन-सी असतात. हे घटक पचनक्रिया योग्य ठेवण्यात मदत करतात.

| Sakal

केळीमध्ये असणारे कॅल्शिअम आणि फायबर अॅसिडिट दूर करतात. यामुळे अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांमधून आराम मिळतो.

| Sakal

अंजीरमुळे अॅसिडिटीची समस्या कमी होते. तुम्ही आहारात याचा समावेश कराल तर अॅसिडीटीपासून मुक्तता मिळू शकते.

| Sakal

काकडीमध्ये टरबूजप्रमाणे फायबरचे गुणधर्म असतात. सॅलड म्हणून हे खाल्ल्याने अॅसिडिटीपासून सुटका होते.

| Sakal