दूध हा एक असा पदार्थ आहे जो आपण जन्म झाल्यापासून ते अगदी म्हतारे होईपर्यंत पितो.
दुधामधील पोषक घटक पाहता भारतीय आयांमध्ये तर आपल्या मुलांना दूध ही पहिली पसंती असते.
दुधात कैल्शियम, थाइमिन, निकोटिनिक एसिड, प्रोटीन आणि इतर अनेक महत्वाचे घटक आढळतात.
वयानुसार, पचनशक्तीसुद्धा बदलत जाते त्यामुळे दूध पिताना काही काळजी घ्यावी लागते.
लहान मुलांचा विचार केला तर, त्यांना सकाळच्या वेळेत दूध देणं सर्वात उत्तम मानलं जात.
लहान मुलांना सकाळच्या वेळी फुल क्रीम दूध देणं सर्वात चांगलं आहे. कॅल्शियमची कमतरता भरून निघेल.
सकाळी दूध प्यायल्याने दिवसभराची कॅल्शियमची कमी भरून निघते.आयुर्वेदात रात्री गरम दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
जेष्ठ नागरिक दिवसभर फार हालचाल करू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी सालीवजी संध्याकाळी दूध प्यावं.