बिहारमधील अभिनेत्रींनी बॉलीवूड (Bollywood actress) जगतात आपलं चांगलं नाव कमावलंय.
बिहारच्या मुली बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या टॅलेंटची चमक दाखवत आहेत.
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) जन्म 18 जुलै 1982 रोजी जमशेदपूर इथं झाला, जो आता झारखंड राज्यात आहे. पूर्वी जमशेजपूर हा बिहारमधील एक जिल्हा होता. प्रियांका चोप्राची गणना भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते.
बॉलीवूड अभिनेत्री नेहा शर्माचा (Neha Sharma) जन्म 21 नोव्हेंबर 1987 रोजी बिहारीमधील भागलपूर जिल्ह्यात झाला. तिनं हिंदी, तेलुगू आणि तमिळ अशा अनेक भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलंय.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा (Sonakshi Sinha) जन्म 2 जून 1987 रोजी बिहारची राजधानी पाटना इथं झाला. ती इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यापूर्वी ती कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करत होती.
बॉलीवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री नीतू चंद्रा (Neetu Chandra) हिचा जन्म 20 जून 1984 रोजी बिहारची राजधानी पाटणा इथं झाला. तिनं हिंदी, तेलुगू, भोजपुरी, कन्नड आणि ग्रीक भाषांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ही बिहारमधील पहिली बिहारी अभिनेत्री आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद हिचा (Shweta Basu Prasad) जन्म 11 जानेवारी 1991 रोजी जमशेदपूर इथं झाला. बिहारपासून झारखंड वेगळं झाल्यानंतर जमशेदपूर हा झारखंडचा जिल्हा बनला.