Birthday रश्मी ठाकरेंचा अन् जल्लोश शिवसैनिकांचा

| Sakal

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.

| Sakal

डोंबिवलीच्या पाटणकर कुटुंबात रश्मी ठाकरेंचा जन्म झाला. माधव पाटणकर असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे. मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.

| Sakal

१९८७ साली त्या एलआयसीमध्ये नोकरी करू लागल्या. एलआयसीमध्ये असतानाच राज ठाकरेंच्या बहीण जयवंती ठाकरे यांच्याशी रश्मी ठाकरेंची ओळख झाली.जयवंती यांनीच रश्मी आणि उद्धव यांची भेट घडवून आणली.

| Sakal

१३ डिसेंबर १९८९ रोजी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांनी लग्नगाठ बांधली.

| Sakal

या दोघांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून आमदार आहेत.

| Sakal

उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

| Sakal

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात रश्मी ठाकरे कायम खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या.

| Sakal

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात रश्मी ठाकरे कायम खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या.

| Sakal