१९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते.
१९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.
१९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले.
मात्र, २००३-०४ मध्ये विधान परिषदेसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली.
त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली.
विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला.