2024 च्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
भाजपाने आत्तापासून तयारीला सुरुवात केली असून विरोधकांच्या बालेकिल्ल्यांवर त्यांची विशेष नजर आहे.
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या सर्वोच्च नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नियोजन करत आहे. मात्र काही तगडे विरोधक त्यांच्या विजयातला अडथळा ठरू शकतात. कोण आहेत ते?
शरद पवार - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या मोदी आणि भाजपाच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्यात आघाडीवर आहेत.
ममता बॅनर्जी - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सातत्याने मोदी सरकारच्या धोरणांना कडाडून विरोध करत असतात.
अरविंद केजरीवाल - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या जास्तच आक्रमक झाले आहेत. अवघ्या काही वर्षांपूर्वी स्थापन झालेला हा पक्ष राष्ट्रीय स्तरावरचा महत्त्वाचा पक्ष बनत चालला आहे. त्यामुळे त्यापासूनही भाजपाने सावध राहण्याची गरज आहे.
राहुल गांधी - सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधींचं नाव सातत्याने पुढे आलं आहे. आता राहुल गांधी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.
नितीश कुमार - बिहारमध्ये अभूतपूर्व सत्तांतर घडवून आणलेले नितीश कुमारही भाजपासाठी धोकादायक ठरू शकतात.