हृतिक रोशनची गर्लफ्रेंड म्हणून सबा आझादची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री असून २००८ मध्ये 'दिल कबड्डी' या चित्रपटातून तिने चित्रपटात पदार्पण केले
याशिवाय २०१० मध्ये सबाने 'द स्किन्स' नावाची स्वतःची थिएटर कंपनी उघडली आहे.
सोबतच सबा एक उत्तम गायिका आहे. तिने 'नौटंकी साला', 'डिटेक्टिव ब्योमकश बक्षी', 'शानदार', 'कारवां' आणि 'मर्द को दर्द नहीं होता' यांसारख्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
२०२० मध्ये सबा सीएएविरोधी निषेधार्थ नवी दिल्लीतील शाहीन बाग येथे दिसली होती. तेव्हा ती चर्चेत आली होती.
आता ह्रतिक रोशनसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे ती पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे.
ते अनेकदा दोघे एकत्र स्पॉट झाले आहे.
सबा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते. ती तिच्या पोस्ट शेअर करत असते.