बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आहुजानं (Sonam Kapoor Ahuja) मुंबईतील मॅरियट बोनवॉय इथं 'शादी' कलेक्शन फंक्शनसाठी उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमासाठी सोनमनं डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला सुंदर ड्रेस परिधान केला होता.
अनारकली स्टाइलच्या ड्रेसमध्ये सोनमनं जॅकेट खांद्यावर ओढून घेतलं होतं.
सोनमचा हा लूक व्हायरल होताच नेटकऱ्यांनी लगेचच तिची तुलना 'शोले' चित्रपटातील 'ठाकूर'शी केली.
सोनमचे हे फोटो समोर येताच इंटरनेटवर ठाकूरच्या आठवणी जागा झाल्या आहेत.
कार्यक्रमात जॅकेट घालण्याच्या विचित्र पद्धतीमुळं सोनम चांगलीच देखील ट्रोल झालीये.
कार्यक्रमात सोनमनं ड्रेसच्या सिल्व्हर गोटा पट्टीसोबत क्रीम रंगाची अनारकली घातली होती. त्यात ती फार सुंदर दिसत होती.
सोनमनं 8 मे 2018 मध्ये आनंद आहुजासोबत लग्न केलं. सोनम आणि आनंद यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं स्वागत झालंय. त्यांनी आपल्या लेकाचं नाव वायू कपूर- आहुजा असं ठेवलंय.