अभिनेता आशिष चौधरीची बायको महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्याच्या घरी दरवर्षी गुढी उभारत तिची साग्रसंगीत पूजा केली जाते.
गिरगावच्या चाळीत बालपण गेलेले जॅकी श्रॉफ आपल्या बान्द्र्यातील आलिशान घरात दरवर्षी पारंपरिक गुढी उभारतात.
मिथिला पालकरनं साडी अन् पारंपरिक दागिन्यांचा साज करीत आपल्या घरी गुढी उभारली आहे.
अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत आपल्या घरी गुढी उभारत साग्रसंगीत पूजा केली.
कंगना रनौतनं एअरपोर्टवर पापाराझीला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विद्या बालननं खास कांजीवरम साडीमध्ये फोटोशूट करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर गुढीपाडवा म्हणजेच नव वर्षाचं स्वागत करत त्याचं महत्त्व आपल्या व्हिडीओतून पटवून दिलं आहे.
शिल्पा शेट्टीनं आपल्या नव्या साऊथ सिनेमातील लूक शेअर करत मराठी भाषेत लोकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.