अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या मुलीसोबतचा अत्यंत अभिमानास्पद आणि तितकाच भावूक करणारा क्षण शेअर केला आहे.
रवीनाची मुलगी राशा हिने नुकतंच तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.
राशा ही धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती.
रवीना टंडन आणि अनिल थडानी यांनी 2004 मध्ये लग्न केले होते.
त्यांना राशा आणि रणबीर थडानी ही दोन मुले आहेत.
याशिवाय रवीनाने पूजा आणि छाया या आणखी दोन मुलींना दत्तक घेतले होतं.
अनेकदा रविना तिच्या मुलीमुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.