गेल्या वर्षापासून बॉलीवूडमध्ये टॉलीवूडच्या चित्रपटांचा मोठा प्रभाव दिसून आला.
एस एस राजामौली यांच्या आरआरआऱनं तर थेट ऑस्करपर्यत मजल मारल्याचे दिसून आले.
केवळ बॉलीवूड नाही तर हॉलीवूडमध्ये देखील आरआरआऱची क्रेझ पाहायला मिळाली.
कमल हासन यांनी आपण अजुनही शर्यतीत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्या विक्रमला देशील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
विक्रमनं बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केल्याचे दिसून आले.
याशिवाय मणिरत्नम यांच्या पीएस १ या चित्रपटानं प्रेक्षकांना भारावून टाकले.
या चित्रपटाचा दुसरा पार्ट आता नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली त्या कांतारानं तर अनेकांना गुंगवून टाकले.
रिषभ शेट्टीनं आपल्या या चित्रपटाचा हिंदी रिमेक काही बनवू नका असे सांगितले आहे.
प्रशांत नील यांच्या केजीएफच्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.