खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आत्ताच थांबवल्या नाहीत तर तुमची हाडे लवकरच ठिसूळ होतील.
सॉफ्ट ड्रिंकमधील कार्बन डायऑक्साइड आणि फॉस्फरस हाडांमधील कॅल्शिअम शोषून घेते.
चहा, कॉफीमधील कॅफेनही हाडांसाठी हानिकारक असते.
मिठामधील सोडियम शरीरातील कॅल्शिअमला यूरिनद्वारे बाहेर काढतो.
चिकनच्या प्रथिनांमध्ये अॅसिडिक गुण असतात जे शरीराला कॅल्शिअम मिळू देत नाहीत.
सोड्यामुळेही शरीराला कॅल्शिअम मिळण्यात अडथळा येतो.
चॉकलेटमुळे शुगर आणि ऑक्सलेट वाढते. यामुळे हाडे कमकुवत बनतात.
दारूमुळे शरीरातील कॅल्शिअम कमी होऊ लागतो.