का कळत नाही तुला.. माझंही एक मन आहे, जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे…
सोबतीची आस आहे... नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा…
स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे.. तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे.
दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय.. आयुष्यभरासाठी या आठवणींना
मनात साठवून ठेवावस वाटतय…
भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे, वरुन शांत असलो तरी हृदयातून रडत आहे.
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला.. असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला
तू कशी का माझ्यापासून दूर गेली.. आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे… व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..
कोपरांकोपरा ह्रदयाचा, तुझ्या आठवणींनी भरलेला… तरीही माझ्या प्रेमाबद्दल, तुला प्रश्न पडलेला…
सोप नसत हो…! जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरण ….
असेल कुणीतरी एखाद्या वळणावर माझीही वाट पाहणारा..माझ्यासाठी थांबलेला
माझ्या भेटीसाठी आसुरलेला..
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे,हे आयुष्यभर साथ देतील.