Celebs Gun License : सलमान खानसह 'या' सेलिब्रिटींकडे आहे GUN

| Sakal

अलीकडेच सलमान खानला सुरक्षेच्या कारणास्तव बंदुक बाळगण्याचा परवाना मिळाला आहे. बॉलीवूडमधील भाईजानशिवाय जगभरातील अनेक स्टार्स असे आहेत जे शस्त्रास्त्रांचे शौकीन असून, त्यांच्याकडे स्वतःचे बंदुकीचे परवाने आहेत.

| Sakal

बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांच्याकडेही परवाना असलेले शस्त्र आहे. बच्चन यांच्या .32 चे रिव्हॉल्वर आहे.

| Sakal

हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटने एका मुलाखतीत खुलासा केला की, त्याच्याकडे लहानपणापासून बंदूक आहे. स्वतःकडे शस्त्रं असण सुरक्षित असल्याचं तो म्हणतो.

| Sakal

डाई किलोचा हात असलेला दबंग अभिनेता सनी देओलकडेदेखील रिव्हॉल्व्हर आहे. ज्याचा वापर त्याने सिंग साहब या चित्रपटातही केला होता.

| Sakal

हॉलिवूड स्टार आणि 'पायरेट्स ऑफ कॅरिबियन' फेम अभिनेता जॉनी डेप लहानपणी शूटिंग गन कशी चालवायची हे शिकत असे. एवढेच नव्हे तर, त्याने रायफलही चालवली आहे. डेपला विविध शस्त्रास्त्रांचा शौक आहे.

| Sakal

जॉनी डेपची माजी पत्नी आणि अभिनेत्री अंबर हर्डलादेखील शस्त्रास्त्रांचा शौक आहे, तिच्याकडे अनेक बंदुका आहेत आणि ती नेहमी रिव्हॉल्व्हर घेऊन झोपते.

| Sakal

अभिनेत्री इवा लोंगोरियाकडेदेखील अनेक बंदुका आहेत, तिच्या घरातून एकदा एके-47 सह अनेक वस्तू चोरीला गेल्या होत्या.

| Sakal

अमेरिकन अभिनेता ब्रूस विल्सदेखील शस्त्रास्त्रांचा शौकीन आहे, त्याच्याकडेदेखील अनेक बंदुका असून, ब्रुसने अमेरिकेत शस्त्रे ठेवणे कायदेशीर बनवण्यासाठी वेळोवेळी भाष्य केले आहे.

| Sakal

माजी फेमिना मिस इंडिया आणि अभिनेत्री पूनम धिल्लनने स्वताच्या सुरक्षेसाठी बंदूक बाळगते. एका मुलाखतीत धिल्लन यांनी याचा खुलासा केला होता.

| Sakal