मुलांना डोळ्यांच्या समस्या आहेत? मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

| Sakal

जर मुलाच्या डोळ्यात काही पडले असेल तर हळूवारपणे डोळे स्वच्छ पाण्यात वारंवार उघडा आणि बंद करा.

| Sakal

पोष्टिक आहार द्या - पालेभाज्या आणि फळे हे डोळे निरोगी ठेवण्यासाठी उत्तम मानली जातात. जर मुलांचे डोळे कमजोर झाले असतील तर त्यांच्या आहारात पौष्टिक अन्नाचा समावेश वाढवा.

| Sakal

हिरव्या भाज्या, गाजर, बटाटा आणि भोपळा भरपूर खा, त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे डोळ्यांची समस्या दूर करण्यासह त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

| Sakal

स्क्रिन टाईम कमी करा - जर मुलांचे डोळे आधीच कमकुवत असतील तर मुलांनी त्यांचा स्क्रिन टाईम कमी करणे खूप महत्वाचे आहे. सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन क्लासेस दरम्यान मुलांना ब्रेक घेण्यास सांगा.

| Sakal

बरेच मुले ही त्यांच्या पालकांचा चष्मा घालतात, यामुळे त्यांचे डोळे खराब होऊ शकतात. तसेच मुले किती वेळ मोबाईल किंवा टिव्ही पाहातात याकडे लक्ष ठेवा.

| Sakal

चष्मा नियमीत वापरा- मुलांना आधीच चष्मा असल्यास, त्यांना तो नियमितपणे वापरण्याचा सल्ला द्या. चष्मा वापरणे हे खूप महत्वाचे आहे जेणेकरून काम करताना किंवा स्क्रिनपुढे बसून देखील डोळ्यांना ताण येणार नाही.

| Sakal

मुलांना मैदानात खेळू द्या - आजकाल मुले मैदानी खेळ खेळणे विसरुन जात आहेत. बऱ्याचदा व्हिडिओ गेम किंवा मोबाइल गेम खेळण्यातच मुले दिवस घालवतात.

| Sakal

यामुळे मुलांची दृष्टी आणखी क्षीण होऊ शकते. त्यामुळे मुलांना घराच्या बाहेर किंवा घराच्या छतावर किमान दररोज दोन तास खेळू द्या. ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.

| Sakal