कॉफी पिण्याचे शौकीन बरेच असतात. पण कॅफेसारखे प्रकार बनवता येत नसतात. अशा सगळ्यांसाठी या प्रकारांची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
एस्प्रेसो ही प्युर डार्क आणि स्ट्राँग कॉफी असतो. यात दूध आणि साखरेचा वापर केला जात नाही. हिला आपण ब्लॅक कॉफी म्हणू शकतो.
डोपिओ ही कॉफी म्हणजे डबल एस्प्रेसो असते. जास्त कॉफी पिणाऱ्यांसाठी ही चांगली असते.
अमेरिकानो कॉफी म्हणजे एस्प्रेसो आणि गरम पाण्याच्या मिश्रणाने ही कॉफी तयार होते. त्यामुळे तुलनेने कमी स्ट्राँग असते.
कॅपेचिनो या कॉफीसाठी एस्प्रेसो कॉफीत दूध आणि दूधाचा फोम वापरला जातो. उकळतं दूध घालून वरून फोम घातला जातो.
लाते कॉफी कॅपेचिनोसारखीच असते. फक्त यात दूध जास्त असते.
कॅफे मोका ही लाते सारखीच असते. फक्त काहीवेळा यात हॉट चॉकलेट मिक्स केले जाते. त्यामुळे जास्त टेस्टी होते.
कारटाडो ही कॉफी म्हणजे एस्प्रेसो आणि गरम दूधाचं मिश्रण असतं. यात फोम वापरला जात नाही.
माकियाटो कॉफी दूध न टाकता एस्प्रेसो आणि दूधाचा फोम वापरून केली जाते.