Cooking Tips : ...तर अस्से बनवतात खान्देश स्पेशल मांडे

सकाळ डिजिटल टीम

खान्देश स्पेशल मांडे म्हणजे पुरणपोळीच. त्यासाठी पिठ सैलसर मळून २० मिनीटं मुरू द्यावं. हरभऱ्याची डाळ शिजवून घेऊन पाणी काढून टाकावं.

Cooking Tips | esakal

डाळीत गुळ घालून शिजवून घ्यावी. पुरण यंत्रातून अगदी चिकण वाटून घ्यावी. त्यात जायफळ, वेलची पूड घालून थंड होऊ द्यावं.

Cooking Tips | esakal

पुरण पोळी सारखी पुरण भरून कणकेच्या गोळा घ्यावा. त्याला हलकेच लाटून मोठा करावा.

Cooking Tips | esakal

ही पोळी लाटून नाही तर हातावर आणि कोपऱ्याच्या सहाय्याने मोठी करतात. सरावाने जमू शकते.

Cooking Tips | esakal

पोळी तव्यावर न भाजता खापरावर, मडक्यावर किंवा अगदी कढईच्या मागच्या भागावर भाजता येईल.

Cooking Tips | esakal

खान्देशी पुरणपोळी तव्यावर न भाजता चुलीवरच्या खापरावर भाजली जाते ही त्याची खासियत आहे.

Cooking Tips | esakal

एक बाजू भाजून झाल्यावर दुसरी बाजू अलगतपणे भाजावी. साजूक तूप घालून पुरण पोळी खावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cooking Tips | esakal