दूध खराब झालं की, एकतर त्यापासू कलाकंद बनवलं जातं किंवा फेकून दिलं जातं.
पण तुम्हाला माहितीये का? यात फार पोषक तत्व असतात. त्यामुळे यापासून वेगवेगळे पदार्थ बनवणं उपयुक्त ठरतं.
फाटलेल्या दूधाचं पनीर बनवून त्यापासून रसगुल्ले बनवता येतात.
उपम्यामध्ये हे फाटलेले दूध घातले तर त्याची पौष्टिकता आणि स्वाद वाढतो.
हे दूध क्रिमी ग्रेव्ही बनवण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरु शकते.
शिवाय या दूधापासून व त्याच्या वेगळ्या झालेल्या पाण्याचा वापर करून भात शिवजवला किंवा पास्ता बनवला तर चव वाढते.
नासलेल्या दूधातून वेगळं झालेल्या पाण्याने चेहरा धुतला तर त्वचा मऊ आणि टोंड होते.