मेष - आजचा दिवशी कामाच्या ठिकाणी अडथळे येण्याची शक्यता आहे. तसंच रागाचा अतिरेक करणं टाळावं. आज जास्तीचा प्रवास करावा लागू शकतो.
वृषभ - आजच्या दिवशी कोणत्याही गोष्टीमध्ये संयम राखण्याचा प्रयत्न करावा. वडिलांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन - आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाऊन दर्शन घेणार आहात.
कर्क - आजचा दिवशी तुमचे तुमच्या जवळच्या मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात. मालमत्तेचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.
सिंह - आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉसशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक रागराग करणं टाळावं.
कन्या - आजच्या दिवशी तुमच्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू देऊ नका. कायदेशीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
तूळ - या राशीच्या व्यक्तींना कुटुंबामध्ये अनावश्यक वादविवाद करणं टाळा. प्रगतीच्या नव्या संधी मिळणार आहेत. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक - आजच्या दिवशी व्यवसायासाठी तुम्हाला नवीन संधींचे दरवाजे उघडणार आहेत. भविष्यातील योजनांबद्दल तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी संवाद साधला पाहिजे.
धनु - आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी अनावश्यक भांडणापासून दूर राहा. कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात. परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी तयार रहा.
मकर - येत्या काही दिवसांमध्ये नोकरीत बढतीची संधी मिळणार आहे. वडिलांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होणार आहे.
कुंभ - आजच्या दिवशी प्रगतीच्या संधी तुमच्याकडे चालून येणार आहेत. दीर्घकालीन प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
मीन - आजच्या दिवशी दुरवरचे प्रवास शक्यतो टाळणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा आज तुम्हाला फायदा होणार आहे.