राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
कमी पावसामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातदेखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
सोंगणीला आलेला हा गहू अक्षरशः आडवा पडला आहे.
काढणीला आलेली पिके शेतात आडवी झाली असून कांदा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे द्राक्षांना तडे गेले असून घड सडण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.
अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत अडकला आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडाशीत आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.