कालपासून दोन शब्द भलतेच चर्चेत आहे, एक म्हणजे मेस्सी आणि दुसरा म्हणजे दीपिका..
फिफा वर्ल्ड कप मध्ये काल अर्जेंटिनानं बाजी आणि मारली जगाला वेड लागले..
यामुळे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा मेस्सी आणि त्या ट्रॉफीचे अनावरण करणारी अभिनेत्री दीपिका पदूकोण ट्रेंडमध्ये झळकू लागले.
एका भारतीय अभिनेत्रीला म्हणजेच दीपिकाला हा मान मिळाल्याने तिची सर्वत्र वाहवा झाली.
गेली काही दिवस 'पठाण' चित्रपटातील 'बिकिनी' प्रकरणामुळे ट्रोल होत असलेली दीपिका अचानक कौतुकाचा विषय ठरली.
दीपिकाला हा मान मिळाल्याने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळाले असे तिचे चाहते म्हणत आहेत.
तर कतारमध्ये शाहरुखचे चाहते असल्याने 'पठाण' चित्रपटासाठी त्याने ही सेटिंग लावल्याचे ट्रोलर्स बोलत आहेत.