यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आरआरआऱ मधील 'नाटू नाटू' आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' नी ऑस्कर जिंकून भारताचं नाव चमकवलं पण त्यासोबतच दीपिकानंही भारताची मान उंचावली.
दीपिकानं ऑस्करच्या मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करत दिलेलं स्पीच सगळ्यांचेच मन जिंकून गेले.
ऑस्कर सोहळ्यातील त्या स्पीचनंतर दीपिकाचं जगभरातून कौतूक होताना दिसलं. भारतीयांनी तर तिचा नुसता उदो उदो केला.
मात्र ऑस्करनंतर भारतात परतल्यानंतर दीपिकावर ट्रोलर्सनी जोरदार निशाणा साधला आहे.
Louis Vuitton ची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आणि साऊथ इंडियन असल्यानं हिला यंदा ऑस्करमध्ये संधी दिली गेली,हिचं काहीच कर्तृत्व नाही असं म्हणत दीपिकाला ट्रोल केलं गेलं.
भारतात परतल्यावर दीपिकाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तिनं ब्लॅक रंगाचा आऊटफिट घातलेला दिसत आहे.
दीपिका प्रभास सोबतच्या 'प्रोजेक्ट के' आणि हृतिक सोबतच्या 'फायटर' सिनेमात आता आपल्याला दिसणार आहे.