दात आणि हिरडे यांची सफाई नियमीत करणे आवश्यक असते, यासाठी नियमीत ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो.
काही लोक दररोज दात घासताना काही चूका करतात ज्यामुळे त्यांना मोठ्या नुकासानीला सामोरे जावे लागते.
जसे की लोक एकाच ब्रशचा वापर अनेक दिवस करत राहातात, पण ब्रशचा तिन महिन्यांपेक्षा जास्त वापरस करू नये.
काही लोक खूप कमी वेळ ब्रश करतात, दात खासताना ते नियमीत पणे ४५ सेकंद ते दोन मिनीटं घासले पाहिजेत.
ब्रश केल्यानंतर पाण्याने तोंड धुण्याएवजी फ्लोराईडयुक्त माउशवॉशचा वापर करा. पाण्याने दूथपेस्टमधील फ्लोराईडची क्षमता कमी होते.
दातांच्या योग्य निगा राखण्यासाठी डेंटल फ्लॉसिंगची सवय लावून घ्या.
दातांच्या सफाईसह नियमीतपणे जीभेच्या सफाईकडे देखील लक्ष देणे गरजेचे असते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.