राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय असतात.
गायिका म्हणूनही त्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
सामाजिक क्षेत्रामध्येही त्या सातत्याने काम करत असतात.
नुकतंच त्यांनी एका स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतला होता
जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.
मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथल्या स्वच्छता मोहिमेमध्ये अमृता फडणवीस या आपली कन्या दिविजासह सहभागी झाल्या होत्या.
अमृता यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन या कार्यक्रमामधले फोटो शेअर केले आहेत.
अमृता फडणवीस यांनी गायन क्षेत्रातही नाव कमावलं आहे. त्यांच्या गाण्याचे अनेक अल्बम्स बाजाराज उपलब्ध आहे.
सोशल मीडियावर त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. राजकीय घडामोडींवरही त्या सातत्याने भाष्य करत असतात.