अति खाणे आरोग्यासाठी घातक असते. पण आपल्याला अशी सवय का असते ?
भूक लागल्यावर लगेच काहीतरी खाणे आवश्यक आहे. असे न केल्यास आपण एकाएकी भरपूर अन्न पोटात घालतो.
एकाच वेळी भरपूर जेवण वाढून घेण्याचीही सवय वाईट आहे.
इतरांशी गप्पा मारत खाताना आपण किती खातो हे कळत नाही.
थकलेले असताना जेवल्याने जास्त अन्न पोटात जाते.
कंटाळा आल्यावरही काहीजण भरपूर खातात.
पटापट खाल्ल्यामुळेही जास्त खाणे होते.
अति खाल्ल्याने पोटाचे विकार होतात.