महाराष्ट्रीयन नथ डिजाइनचे काही प्रकार जाणून घेऊया.
ब्राह्मणी मोती नथ ही कायमस्वरूपी जपली जाणारी आणि अगदी पूर्वपरंपरागत चालत आलेली नथ आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील परंपरा ही कारवारी नथ प्रामुख्याने परिधान केली जाते. या नथमुळे महिलेचं सौंदर्य हे अधिक खुलून दिसतं.
पेशवाई नथ पारंपरिकतेला दर्शवणारा दागिना आहे. सध्या ही नथ प्रचंड ट्रेंडमध्ये आहे.
पाचू नथ अतिशय रॉयल दिसत असून लग्न अथवा मुंजीमध्ये अधिक शोभून दिसते.
प्रत्येक महिलेला आपल्याकडे हिऱ्याची नथ असावी, असं सतत वाटतं. ही नथ मुख्यत्वे राजस्थानी आणि मारवाडी विवाहित महिलांमध्ये घालण्याची पद्धत आहे.
बाजीराव मस्तानी या नथीमध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या दोन्ही मोत्यांचा वापर केला जातो. तसंच याचा आकार थोडा मोठा असून याची तार मात्र सरळ रेषेत असते. चित्रपटात या नथीचा विशेष वापर केला जातो.
पुणेरी नथ ही इतर नथींच्या तुलनेत जड असते. मोठे मोती आणि खड्यांनी ही नथ बनवण्यात येते. इतर नथींपेक्षा ही बरीच वेगळी आणि भारदस्त दिसते
अर्धगोलाकार असणारी ही नथ आकाराने लहान असते पण याचा नाजूकपणाच महिलांचं सौंदर्य अधिक वाढवतो.
अनेकदा महिला पारंपरिक नथीपेक्षा मुघल नथ घालण्याला अधिक पसंती देतात. ही नथ म्हणजे एक मोठी रिंग असते आणि त्याला जोडलेली चैन तुमच्या केसात अडकवता येते.