साताऱ्यात एका ‘पेटिंग’वरुन मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यात वाद सुरू होता.
मात्र, तो वाद मिटण्यात यश आलं आहे. दोन्ही नेत्यांच्या मध्यस्थीनं वाद मिटल्याचं बोललं जात आहे.
पालकमंत्री देसाई यांच्या पोवई नाक्यावरील कोयना दौलत या निवासस्थानाजवळ खासदार उदयनराजे यांच्या मालकीची इमारत आहे.
या इमारतीच्या भिंतीवर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंचं मोठं चित्र काढण्याचं नियोजन केलं होतं.
मात्र, सातारा पोलीस प्रशासनानं या ठिकाणी चित्र काढण्यास मज्जाव केला होता, त्यामुळं परिसरात तणाव निर्माण झाला होता.
चित्र काढणाऱ्या कारागिराला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यामुळं राजे समर्थक नाराजी होते.
दरम्यान, उदयनराजे हे आमचे जवळचे मित्र व पक्षातील सहकारी आहेत. त्यांचं रेखाचित्र चितारलं जाणार असेल तर मला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आणि वादावर पडदा ओढला. (फोटो : प्रमोद इंगळे)