बॉलिवूडचे सर्वांत महागडे घटस्फोट; द्यावं लागली इतकी पोटगी

| Sakal

मॉडेल रिया पिल्लईने संजय दत्तपासून घटस्फोट घेतल्यानंतर लिएंडर पेसशी लग्न केले. रियाने मुलाच्या शिक्षणासाठी दरमहा चार लाखांची मागणी केली.

| Sakal

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाने बरीच चर्चा केली होती. मलायकाने १०-१५ कोटी भरपाईची मागणी केली होती.

| Sakal

सैफ अली खान आणि अमृता सिंग लग्नाच्या १३ वर्षांनंतर वेगळे झाले. पोटगीसाठी ५ कोटी रुपये ठरले होते. मुलांच्या संगोपनासाठी अमृताला दरमहा एक लाख दिले जाते.

| Sakal

फरहान आणि अधुना यांनी लग्नाच्या १६ वर्षांनंतर वेगळे होण्याची घोषणा केली. घटस्फोटानंतर अधुनाने मुंबईतील १,००० स्क्वेअर फुटांचा बंगला ठेवण्याची मागणी केली होती.

| Sakal

करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. करिश्मा आणि संजयमध्ये १४ कोटींमध्ये समझोता झाला होता. तसेच संजय दर महिन्याला करिश्माला १० लाख देतो, असे वृत्त आहे.

| Sakal

आमिर खान आणि रीना दत्ता यांच्यात २००२ मध्ये घटस्फोट झाला. आमिरने पोटगी म्हणून ५० कोटी दिल्याचा दावा आहे.

| Sakal

हृतिक रोशन आणि सुजैन खान लग्नाच्या १४ वर्षांनंतर वेगळे झाले. सुझानने ४०० कोटींची मागणी केली होती. मात्र, हृतिकने अशा बातम्यांचे खंडन केले.

| Sakal
| Sakal