आता दिवाळीच्या फराळासाठी तुपाची मागणी वाढेल. अशावेळी भेसळयुक्त तूप विक्रीसाठी बाजारात येते. त्यापैकी शुद्ध तूप कसे ओळखाल ?
अनेकदा तुपामध्ये डालडा, खोबरेल तेल आणि रिफाइन्ड ऑइल यांची भेसळ केली जाते.
शुद्ध तूप नेहमी दाणेदार असते.
थोडेस तूप हाताच्या तळव्यावर ठेवा. त्यानंतर ते लगेच वितळले नाही तर ते भेसळयुक्त आहे.
उकळत्या पाण्यात तुपाची वाटी ठेवा. वितळलेले तूप फ्रीजमध्ये ठेवा. तूप भेसळयुक्त असल्यास त्यातील तेलाचा थर वेगळा दिसेल.
तूप वितळवल्यानंतर त्याला डार्क ब्राऊन रंग आल्यास ते शुद्ध तूप आहे. पिवळसर रंग आल्यास ते भेसळयुक्त आहे.
पाण्यात तुपाचे काही थेंब टाकून पाहा. तूप वर तरंगत असल्यास ते शुद्ध आहे.
काही वेळ तूप हातावर घ्या. त्यानंतर गोडसर वास येत असल्यास ते शुद्ध आहे.