Diwali Recipe: घरच्या घरी शेव कसे तयार करायचे?

| Sakal

साहित्य : 4 वाट्या बेसन पीठ, तिखट, मीठ, ओव्याची पूड, हिंग पुड, तेल,

| Sakal

डाळीचे पीठ चाळणीने चाळून घ्यावे. 

| Sakal

त्यामध्ये ओवापूड, हिंग, तिखट, मीठ व पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन घालावे. 

| Sakal

लागेल तसे पाणी घालून घट्टसर (पात्रातून पडण्याइतपत) भिजवावे.

| Sakal

कढईत साधारण दोन ते अडीच वाट्या तेल घालावे.

| Sakal

तेल चांगले तापल्यावर हलक्या हाताने पात्रातून शेव घालावी.

| Sakal

एकदम तेलात शेव घालावयाची असल्याने वेताने सोडावी, म्हणजे तेल हातावर उडणार नाही. 

| Sakal

रंग बदलला की झाऱ्याने उलटावी. एक मिनिटाने काढावी, गार झाल्यावर तुकडा मोडून पाहावा. 

| Sakal

घरच्या घरी शेव तयार झाले आहे.

| Sakal