बदाम तेलात ऑरगॅनिक मध घालून मिश्रण तयार करा आणि रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या भोवती लावा.
ग्रीन टी बॅगमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आणि tannins असते. याचा उपयोग डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे कमी करण्यासाठी होतो.
दुधात लॅक्टिक अॅसिड, प्रोटीन, एन्झाईम्स आणि इतर अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवणे हा अतिशय उत्तम उपाय आहे.
बर्फामुळे डोळ्यांखालील रक्तवाहिन्या मोकळ्या झाल्याने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. त्यामुळं बर्फाने डोळ्याखाली मालीश करा.
सफरचंदात tannic अॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा नैसर्गिकरीत्या उजळ होण्यास मदत होते. काळे डाग, स्पॉट्स दूर करण्यास देखील ते फायदेशीर ठरते.
डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी पुदिना देखील चांगला उपाय आहे. त्यात अँटीबॅक्टरील, अँटिसेप्टिक आणि अँटीमिक्रोबियल गुणधर्म आहेत. तसंच पुदिन्यातून त्वचेला थंडावा मिळतो.
डार्क सर्कल्सवर नाईट जास्मिन आणि ऑलिव्ह ऑईल लावल्याने देखील फायदा होतो. नाईट जास्मिन ऑईलमध्ये अँटी इन्फ्लामेटरी कंपाऊंडस असतात. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलची मदत होते.