Don't Do : कधीही करू नये अशा गोष्टी

| Sakal

पांढऱ्या पँटवर पिवळा झब्बा/ शर्ट घालू नये - वरणभात दिसतो.

| Sakal

कुत्री/ मांजर पालकांसमोर “हा कुत्रा/ तो बोका” असे कधीही म्हणू नये…. संबंध मोडायची दाट शक्यता.

| Sakal

सगळ्या दक्षिण भारतीयांना “मद्रासी” म्हणू नये- आपले अज्ञान उघडकीस येते.

| Sakal

श्रीखंड चमच्याने खाऊ नये- बोटाने स्पर्श करून इच्छित स्थळी पोचवावे…. तरच तुम्ही “फूडी”

| Sakal

लग्न झालेल्या तरूण जोडी ला “पेढा/ बर्फी कधी देता?” विचारू नये… हल्ली त्याची फॅशन नाही.

| Sakal

भेंडी चिरल्यानंतर धुवू नये, भाजी कुरकुरीत होणार नाही.

| Sakal

विवाहबाह्य संबंध असतील तर कुठलाही वाहतूक नियम मोडू नका - प्रत्येक सिग्नल ला कॅमेरा असतो (पुरावा मिळेल)

| Sakal