स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते.
स्वयंपाकघरात कुटुंबासाठी अन्न तयार केले जाते. म्हणूनच स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवायला हवं असं म्हटलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे.
आपण नकळत अनेक वेळा वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करतो, त्याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतो.
स्वयंपाकघरात स्वच्छतेच्या वस्तू ठेवणे शुभ मानले जात नाही.
स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने घरात अन्नाची कमतरता भासते. याचा परिणाम घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो.
वास्तू नियमानुसार औषधे स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर कधीही करू नये.
स्वयंपाकघरात देव्हाऱ्याची स्थापना करू नये. देव्हारा स्वयंपाकघरात ठेवल्याने देवतांचा कोप होतो, असे मानले जाते.