कमी गुंतवणुकीत जास्त पैसा कमवण्याचे किंवा अतिरीक्त पैसा कमवण्यासाठी काही पर्याय देत आहोत.
जर तुमच्याकडे कला, गुण असतील तर तुम्ही त्याचा वापर करून कमी गुंतवणुकीत पैसा कमवू शकतात.
ऑनलाइन टिचिंग कोर्स, आर्टिकल लिहिणे, ब्लॉग लिहिणे असे अनेक कन्सल्टिंग सर्व्हिसच्या प्रकारातील अनेक कामे वेबसाइट किंवा पब्लिकेशनद्वारे करू शकतात.
तुमच्याकडे असलेली अतिरीक्त खोली, घर, जमीन भाड्याने देऊन त्यातून अधिक उत्पन्न कमवू शकतात.
डिव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करणे हाही एक पैसा कमावण्याचा सोपा मार्ग आहे. अधिक उत्पन्नासाठी कमी जोखमीच्या पर्यायाच्या शोधात असणाऱ्यांसाठी उत्तम.
पेमेंट करणाऱ्या सर्वेक्षणात भाग घेऊन पैसे कमवू शकता. यात तुम्हाला फार पैसा मिळेलच असं नाही, पण कमी भांडवलात पैसे कमावण्याचा हा चांगला मार्ग आहे.
जर तुमचे सोशल मीडियावर फॉलोवर्स भरपूर असतील तर एखाद्या ब्रँडशी टायअप करुन जाहिरातीच्या माध्यमाने तुम्ही पैसे कमवू शकतात.