विजेचे वाढते बिल सामान्यांसाठी डोकेदुखी ठरले आहे. कारण, वीच बिल भरताना चांगलीच दमछाक होते.
काही छोट्या ट्रिक वापरून व खबरदारी घेऊन बिल कमी करता येते.
चिमणीचा वापर सामान्यतः स्वयंपाकघरात केला जातो. सर्वांत जास्त वीज बिल येणाऱ्या उपकरणांच्या यादीत चिमणीचाही समावेश आहे.
गीझरसुद्धा भरपूर वीज वापरतो. म्हणूनच दुसरा पर्याय शोधणे फार महत्त्वाचे आहे.
गॅस गीझर हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हे केवळ काम चांगले करीत नाही तर विजेचीही बचत करते.
एसी घरातील सर्वाधिक वीज वापरणाऱ्या उपकरणांच्या यादीत समाविष्ट आहे.
तुम्ही नॉन-इन्व्हर्टर एसीऐवजी इन्व्हर्टर एसी वापरू शकता. इन्व्हर्टर एसी विजेची बचत करण्याला उत्तम पर्याय आहे.
इन्व्हर्टर एसीच्या आउटडोअरमध्ये पीसीबी आहे. जे कंप्रेसरचा वेग नियंत्रित करते आणि १५ टक्के विजेची बचत करते.