Pooja Sawant: मन धागा धागा जोडते नवा.. कलरफूल पूजा!

| Sakal

‘मिस कलरफूल’ या नावाने ओळखली जाणारी मराठी चित्रपटसृष्टीतील दिलखुलास अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत

| Sakal

तिचा सहजसुंदर अभिनय, दिलखुलास व्यक्तिमत्व आणि मनमोहक नृत्य यामुळे तिने चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. 

| Sakal

पूजा नृत्यकलेत किती निपुण आहे याचा प्रत्यय आपण सर्वांनीच घेतला आहे.

| Sakal

छोट्या पडद्यावरील ‘बूगी वूगी’ या डान्स रिआलिटी शोद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करून पूजाने आज बॉलिवूडपर्यंत मजल मारलीय.

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीत तिने अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 

| Sakal

पूजाने 'बूगी वूगी’ या कार्यक्रमानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स श्रावणक्वीन’ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

| Sakal

सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. ती सतत तिचे सुंदर फोटो आणि रोजचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.  

| Sakal

पूजाला तिच्या वडिलांकडूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. कारण, पूजाचे वडील विलास सावंत यांनी 30 वर्षे अभिनय क्षेत्रात काम केले होते.

| Sakal