नवरात्रीला गरबा क्वीन फाल्गुनीचं सरप्राइज...

प्रणाली मोरे

गरबा क्वीन फाल्गुनी पाठकनं आतापर्यंत तिच्या अनेक गाण्यांवर लोकांना पाय थिरकवायला मजबूर केलं आहे.

Esakal

अनेक गायक गरब्याच्या राज्यात आले पण क्वीन एकच राहिली...फाल्गुनी. यंदा या गरबा क्वीनने नवरात्रीआधीच चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे.

Esakal

फाल्गुनी पाठकनं आपलं नवं गाणं रिलीज केलं आहे. आणि यातला कलरफुल आणि फाल्गुनीचा एनर्जेटिक अंदाज चाहत्यांना भलताच आवडत आहे.

Esakal

काही तासातच फाल्गुनीच्या या गाण्याला लाखो व्हयूज मिळाले आहेत. चाहत्यांमध्ये हे गाणं सुपरहिट ठरणार अशी आशा फाल्गुनीला देखील आहे.

Esakal

फाल्गुनीनं रिलीज केलेल्या नवीन गाण्याचे नाव 'वसालडी' आहे. फाल्गुनीच्या आतापर्यंतच्या गाण्यांपैकी हे सर्वात बेस्ट गाणं असल्याचं म्हटलं जात आहे.

Esakal

'वसालडी' या गाण्याला शैल हाडासोबत मिळून फाल्गुनीनं संगीत दिलं आहे. तर भोजक अशोक अंजमने ते गाणं लिहिलं आहे.

Esakal

फाल्गुनी सध्या बॉलीवूडपासून लांब असली तरी तिनं गुजरातीमध्ये एक नवीन गाणं काही महिन्यांपूर्वीच रिलीज केलं होतं. तिथे ते जबरदस्त हिट ठरलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal