बॉलीवूड गायक अरिजित सिंह त्याच्या सरळ साध्या स्वभावामुळे कायमच चर्चेत असतो.
त्याचा हा साधेपणा नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतो.
नुकताच अरिजितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये तो पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद या त्याच्या गावी स्कूटरवरून घरातील सामान आणायला जात असल्याचे दिसत आहे.
अरिजितने अतिशय साधे कपडे परिधान केले आहेत. एवढेच नाही तर हातात पिशवी आणि पायात साधी चप्पल घालून अरिजित फिरताना दिसत आहे.
पुन्हा एकदा आपल्या आवडत्या गायकाचा नम्र स्वभाव चाहत्यांना भावला आहे.
अरजितचे चाहते खूप खूश झाले आहेत.