बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री फातिमा सना शेख ही तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून फातिमाच्या नव्या लूकनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे.
दंगल गर्ल म्हणून जिच्याकडे पाहिले जाते त्या फातिमाच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी फातिमा सना शेख आणि आमीर खान यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु होती.
आमिरच्या मुलीच्या लग्नात ती देखील हजर होती. यावेळी तिच्या फोटोंवरुन वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.
आता फातिमा वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. तिचं नेटकऱ्यांनी कौतूक केलं आहे.
फातिमाच्या त्या फोटोंवर आलेल्या कमेंट खास चर्चेचा विषय झाला आहे.
सोशल मीडियावर फातिमाच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.