सध्या 'पठाण' चित्रपटातील गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र यापूर्वीही अनेक चित्रपटातील गाण्यांमुळे वाद निर्माण झाले आहेत
बेशरम रंग : या गाण्यात दीपिका पदुकोनने केशरी रंगाची बिकिनी घातली म्हणून वाद निर्म झाला आहे
घूमर : दीपिका पदुकोणच्या 'पद्मावत' चित्रपटातील 'घूमर' हे गाणेही वादांमुळे खूप चर्चेत आले होते. 2018 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता
पनघट - 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या कनिका कपूरच्या पनघट या गाण्यावरून उत्तर प्रदेशात बराच गदारोळ झाला होता. या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी मथुरेच्या संतांनी केली होती
राधा- आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या डेब्यू चित्रपटातील 'राधा' गाण्यावरही अनेकांनी आक्षेप घेतला होता
मुन्नी बदनाम हुई - 'दबंग' चित्रपटातील हे गाणे आजही लोक विसरलेले नाहीत. या गाण्यातील शब्दांमुळे झंडू बाम कंपनीने चित्रपट निर्माता अरबाज खानला 'झंडू बाम' शब्द वापरल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती