वासोटा हा एक जंगलातील ट्रेक आहे. जेवढा आकर्षक तेवढाच धोकादायक ट्रेक आहे.
या जंगलातमध्ये जंगली प्राण्यांची भिती असते, त्यामुळे येथे जाण्याआधी आवश्यक त्या वस्तू सोबत घेणे गरजेचे आहे.
या किल्ल्यावर मुक्काम करण्यास मनाई आहे, त्यामुळे वन विभागाने ठरवून दिलेल्या वेळेतच आपल्याला जाऊन परत यावे लागते.
किल्ल्यावर जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे आपण खाद्यपदार्थ सोबत नेले पाहिजेत. पण गडावर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये
गडावर जाण्याआधी कोयना धरणाच्या बॅकवॉटरमधून बोटीने जावे लागते. त्यामुळे याची पूर्णपणे माहिती घेतली पाहिजे
ट्रेकला जाण्यापूर्वी अधिक माहिती घेणे गरजेचे आहे, त्यासाठी तेथील स्थानिक लोकांची मदत घेणे गरजेचे आहे.
या ट्रेकला जाताना ग्रुपने जावे. एकट्याने किंवा दोघांनी या ट्रेकला जाऊ नये.