बाबो..! करोडपती नाही, अब्जाधीश आहेत या महिला, फोर्बसची यादी जाहिर

धनश्री भावसार-बगाडे

सावित्री जिंदल ($17 बिलियन)

फोर्ब्जनुसार जिंदल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदल भारताच्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. ७३ वर्षीय जिंदल या देशातल्या सर्वात श्रीमंत लोकांमध्ये ६ व्या क्रमांकावर आहेत.

Forbes Richest Indian Women Networth | esakal

जगात ९४ व्या स्थानावर

जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा नंबर ९४ व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १७ अब्ज डॉलर (13,91,31,82,50,000 रुपये) आहे.

Forbes Richest Indian Women Networth | esakal

रोहिका साइरस मिस्त्री ($7 बिलियन)

रोहिका साइरस मिस्त्री, दिवंगत साइरस मिस्त्री यांच्या पत्नी आहेत. त्या स्वतः एक कॉर्पोरेट आयकॉन आहेत. काही प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपनीजच्या डायरेक्टर होत्या.

Forbes Richest Indian Women Networth | esakal

पल्लोनजी मिस्त्री यांची सून

55 वर्षीय रोहिका साइरस मिस्त्री यांची एकूण संपत्ती ७ अब्ज डॉलर आहे. त्या दिवंगत कंस्ट्रक्शन टायकून पल्लोनजी मिस्त्री यांची सून आहेत.

Forbes Richest Indian Women Networth | esakal

रेखा झुनझुनवाला ($5.1 बिलियन)

बिग बुल म्हणून प्रसिद्ध असणारे गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचा देशातल्या सर्वात श्रीमंत महिलांमध्ये सहभाग आहे.

Forbes Richest Indian Women Networth | esakal

नेटवर्थ 5.1 अब्ज डॉलर

59 वर्षीय रेखा झुनझुनवाला यांची नेटवर्थ 5.1 अब्ज डॉलर आहे. झुनझनवाला यांच्या पोर्टफोलियो मध्ये टायटन, स्टार हेल्थ अँड एलाइड इंश्योरेंस आणि मेट्रो ब्रँड्स यांचा समावेश आहे.

Forbes Richest Indian Women Networth | esakal

विनोद राय गुप्ता ($4 बिलियन)

विनोद राय गुप्ता Havells India चे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल गुप्ता यांची आई आहे. त्यांचं नाव भारताच्या सर्वात श्रीमंत महिलांमध्ये घेतलं जातं.

Forbes Richest Indian Women Networth | esakal

4 अब्ज डॉलर्सच्या मालकीण

त्यांचं एकूण नेटवर्थ 4 अब्ज डॉलर एवढे आहे. Havells India इलेक्ट्रॉनिक संबंधित काम जसे फॅन्स, फ्रीज, स्वीच यासारख्या वस्तू बनवतात.

Forbes Richest Indian Women Networth | esakal

सरोज रानी गुप्ता ($1.2 बिलियन)

सरोज रानी गुप्ता, महालक्ष्मी एसोबिल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आहेत. 72 वर्षीय सरोज रानी गुप्ता यांची एकूण संपत्ति 1.2 अब्ज डॉलर आहे. त्या एपीएल अपोलो ट्यूब्स च्या को-फाउंडर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes Richest Indian Women Networth | esakal