Bhagat Singh Jayanti: ‘या’ कारणामुळे गांधीजी अन् भगतसिंगमध्ये होते मतभेद

सकाळ डिजिटल टीम

आज शहीद भगतसिंग यांची 115 वी जयंती आहे. 

भगतसिंगचे कुटुंब स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे लहानपणापासूनच भगतसिंग यांच्यावर खोल परिणाम झाला.

वयाच्या १४ व्या वर्षी भगतसिंग यांनी शाळांची पुस्तके आणि कपडे जाळले होती त्यानंतर गावांमध्ये भगतसिंग यांचे पोस्टर्स लागली होती.

१३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भगतसिंग यांच्यावर छाप सोडली.

१९२० भगतसिंग महात्मा गांधी यांच्या अहिंसा चळवळीत सहभागी झाले. या चळवळीररम्यान गांधीजींनी अनेक विदेशी मालावर बहिष्कार टाकला होता.

पुढे हिंसाचारावरुन भगतसिंग आणि गांधीत यांच्याशी मतभेद झाले. यानंतर भगतसिंग हे चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या गदर दलात सहभागी झाले.

भगतसिंग यांनी राजगुरू यांनी लाहोरमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक असलेल्या एका ब्रिटिश अधिकारीची हत्या केली.

खुप कमी लोकांना माहिती आहे की भगतसिंह हे एक चांगले लेखक होते.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिश सरकारने २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.