बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये मालगाड्यांचे सिन आहेत. मालगाडी आणि बॉलिवूड हे नातं बरंच जुन आहे.
अगदी सुपर-डूपर हीट शोलेपासून अलिकडच्या सिनेमांपर्यंत आजही मालगाडीतले सिन चित्रीत होतात.
एक ट्रेंड यात कॉमन दिसतो, तो म्हणजे कोळसा वाहणाऱ्या मालगाडीवरच्या कोळसा चोरीचा प्रसंग.
मालगाडी फक्त मालवाहतुकीसाठी नाही तर स्टोरी पुढे नेण्यासाठीही सिनेमात महत्वाची भूमिका बजावताना बघायला मिळते.
काही सिनेमांमध्ये मालकाडी काही सेकंदांसाठी दिसत असली तरी तो सिने सिनेमासाठी महत्वपूर्ण वळण देणारा दिसतो.
२२ डिसेंबर १८५१ रोजी भारतीय रेल्वेचा प्रवास मालगाडीने सुरू झाला होता.
थॉमसन यांनी सन १८५१ मध्ये पहिले वाफेचे इंजिन रुरकी येथे चालवले.