'बाप्पाच्या कानात काय सांगितलं भूषणने?'

| Sakal

अभिनेता भूषण प्रधानच्या घरची बाप्पाची मूर्ती त्याची आई स्वतः बनवते. पुण्यातील घरात गणपती घडवला जातो तर मुंबईच्या घरात त्याची स्थापना होते.

| Sakal

भूषणच्या घरी सर्व आप्तेष्टांच्या उपस्थितीत यंदा गणेशाचं आगमन आणि स्थापना झाली.

| Sakal

भूषणही गणेशोत्सवात शूटिंग मधून ब्रेक घेत बाप्पाच्या सेवेत मग्न होऊन जातो.

| Sakal

लहानपणापासून बाप्पा आपल्या घरी यावेत असा भूषणचा हट्ट होता. पण आईची अट होती, 'स्वतःचं घर घे आणि मग बाप्पांना आण'.

| Sakal

भूषणने गणेश चतुर्थीच्या दिवशीच आठ वर्षापूर्वी स्वतःचं घर घेतलं आणि पुढील वर्षी बाप्पांची स्थापना करुन आपला हट्टही पूर्ण केला. यावेळी त्यानं मोदकांवर आडवा हात मारल्याचं तो म्हणाला.

| Sakal

भूषण म्हणतो,''मी बाप्पांची मनोभावे पूजा करतो. मंदिरातही जातो. पण तरिही मी बाप्पाकडे काही मागत नाही. कारण मला माहित आहे,तो नेहमी सर्वांनाच न मागता सगळं देतो''.

| Sakal

भूषणच्या गणपतीचं विसर्जन हे घरातच केलं जातं. घरातील पिंपालाच विहिरीचा लूक देऊन भूषण आणि त्याचं कुटुंब पारंपरिक पद्धतीनं घरातच बाप्पाला निरोप देतात.

| Sakal