उद्यापासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे, त्यामुळे सर्व गणेशभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे.
गणेशोत्सवामध्ये ढोल ताशा सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित केले जातात.
पुणे - मुंबईत गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातील गणेशभक्तांची गर्दी होत असते.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा असतात.
गणेश मंडळे गणपतीसमोर देखावे तयार करून सजावट करत असतात.
यावर्षी २८ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे.
सर्व गणेशभक्तांसाठी हा वर्षभरातला महत्त्वाचा सण आहे.