अभिनेत्री गौहर खानने नुकतीच आनंदाची बातमी दिली.
गौहरने झैद दरबार सोबत 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती.
लॉकडाउनमध्ये ते दोघे एकमेकांना भेटले, मग प्रेम झालं आणि 2020 मध्ये ते विवाह बंधनात अडकले.
तब्बल दोन वर्षांचा संसार केल्यानंतर ते आई बाबा होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
गौहर अभिनेत्री आणि बिग बॉस हिंदीची 7व्या पर्वाची विजेती देखील आहे.
तर झैद हा इस्माईल दरबार या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाचा मुलगा आहे.
अजून तिच्या प्रसुतीला वेळ असला तरी तिने नुकतेच बेबी बंप दाखवत फोटो शेयर केले आहेत.