आदित्य आणि अमित या जोडीने सोशल मीडिया यूजर्सना मोठा धक्का दिला आहे.
२०१९ मध्ये या समलिंगी जोडप्याने लग्न केले होते.
या दोघांनी चार वर्षांपूर्वी अमेरिकेत मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. दरम्यान या जोडप्यांनी आता पालक बनणार असल्याची घोषणा केली आहे.
या दोघांनी सोनोग्राफीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
समलिंगी जोडप्याला मूल कसे होऊ शकते?, हा प्रश्न सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या समलिंगी जोडप्याने सांगितले की ते मे महिण्यात आलप्या पहिल्या अपत्याचे स्वागत करणार आहेत.
लग्न केल्यानंतर पालक बनण्यासाठी ते रीसर्च करत होते.
दरम्यान या दोघांनी IVF बद्दल वाचले. ते या तंत्रज्ञानाच्या मदतीने ते आपल्या जैविक मुलाला जन्म देणार आहेत.
यामध्ये शुक्राणू आणि स्त्री दात्याचे अंडे स्वतंत्रपणे फलित करून जैविक मूल जन्माला येते.
आदित्य आणि अमित यांनी पीपल मॅगझिनने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.