मराठी चित्रपटविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक ही नेहमीच तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते.
गिरीजा ओक ही तिच्या हटके फोटोसाठी चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते.
इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. सध्या तिच्या एका फोटोनं कमाल केली आहे.
गिरिजा ही एका मसाल्याची जाहिरात करते आहे, त्याचे प्रमोशन फोटोशुट व्हायरल झाले आहे.
त्या फोटोंमध्ये गिरिजाचा लूक चाहत्यांना कमालीचा भावला आहे. त्यावरील कमेंटही भन्नाट आहे.
चाहत्यांना गिरिजाचा तो मसाला लूक आवडला आहे. त्यांनी त्या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.
यापूर्वी देखील गिरिजानं शेयर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी आपल्या पसंतीची मोहोर उमटवली आहे.
केवळ मराठीच नाहीतर हिंदी चित्रपट, वेबसीरिजमध्ये देखील तिनं आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.